

Multi Cap Funds Investment Strategy Benefits Risks and How Large Mid and Small Cap Stocks Balance Your Mutual Fund Portfolio
sakal
राजेंद्र साताळकर, संचालक, ॲक्युमेन मनी प्रा. लि.
भारताची आर्थिक प्रगती केवळ मोजक्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांवर अवलंबून नाही. या परिचित मोठ्या नावांमागे असे शेकडो व्यवसाय आहेत, जे सुटे भाग तयार करतात; विशेष तंत्रज्ञान विकसित करतात; विशिष्ट बाजारपेठांना सेवा देतात आणि नवी मागणी निर्माण करतात. यातील काही कंपन्या आज आकाराने लहान असल्या, तरी अर्थव्यवस्थेतील त्यांचे योगदान आणि भविष्यात विस्तार करण्याची त्यांची क्षमता त्यांना मोठ्या कॉर्पोरेट विश्वाचा एक महत्त्वाचा भाग बनवते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी, केवळ मोठ्या कंपन्यांकडेच लक्ष दिल्यास गुंतवणुकीच्या एका मोठ्या संधीकडे दुर्लक्ष होऊ शकते.