

CNG Price Hike
esakal
Mumbai: मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा महागाईची झळ बसणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने (MGL) सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १.५० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या भागांत सीएनजीचा नवा दर ९१.५० रुपये प्रतिकिलो होणार आहे. ही दरवाढ १५ नोव्हेंबरपासून, म्हणजेच आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.