

Mutual Fund
मुंबई - नोव्हेंबर महिन्यात म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखाली असलेली एकूण मालमत्तेने (एयूएम) ८० हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडत नवा विक्रम नोंदविला आहे. इक्विटी म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक ऑक्टोबरमधील २४,६९० कोटी रुपयांच्या तुलनेत २१.२ टक्क्यांनी वाढून २९,९११ कोटी रुपयांवर पोहोचली, तर मासिक ‘एसआयपी’ योगदान मात्र, ऑक्टोबरच्या तुलनेत किंचित कमी झाले आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (अॅम्फी) आज ही आकडेवारी जाहीर केली.