म्युच्युअल फंड : ‘एसआयपी’ आणि ‘स्टेप-अप एसआयपी’ का ठरतात प्रभावी?

नियमित एसआयपीमुळे बचत स्वयंचलित होऊन रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग व चक्रवाढीचा लाभ; तर स्टेप-अप एसआयपीमुळे दरवर्षी गुंतवणूक वाढवून महागाईवर मात करत दीर्घकालीन संपत्तीनिर्मिती वेगवान
SIP builds investment discipline, while Step-Up SIP accelerates long-term wealth creation

SIP builds investment discipline, while Step-Up SIP accelerates long-term wealth creation

Sakal

Updated on

अभिजित बोंगिरवार, संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक, ग्रोफिन वेल्थ प्रा.लि.

आयुष्यात अनेकदा अगदी साध्या वाटणाऱ्या सवयीच मोठा परिणाम घडवतात. रोज चालणे, पायऱ्या चढणे किंवा झोपण्यापूर्वी मोबाईल बाजूला ठेवणे या छोट्या गोष्टी आरोग्यात मोठा बदल घडवू शकतात. हाच नियम गुंतवणुकीलाही लागू होतो. एकरकमी रक्कम गुंतवण्यापेक्षा किंवा बाजारातील योग्य वेळ साधण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, दरमहा नियमितपणे एक ठरावीक रक्कम गुंतवणे दीर्घकालीन संपत्तीनिर्मितीसाठी अधिक प्रभावी ठरते. यालाच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) म्हणतात. ‘एसआयपी’मुळे बचत स्वयंचलित होते. पगार किंवा उत्पन्नातून ठरलेली रक्कम आपोआप म्युच्युअल फंडात गुंतवल्याने अनावश्यक खर्च कमी होतो व आर्थिक शिस्त निर्माण होते. विशेष म्हणजे, ‘एसआयपी’ची सुरुवात अवघ्या ५०० रुपयांपासूनही करता येते. त्यामुळे ‘मोठी रक्कम जमा झाल्यावर गुंतवणूक करेन’ हा विचार मागे पडतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com