
लीना गोखले
lhgokhale@gmail.com
योग्य संधीची वाट बघत थांबणे व अनुकूल वेळ येताच भक्ष्यावर झडप घालणे ही प्राणी, पक्षी जगताने शिकवलेली पद्धत हुशार व धाडसी गुंतवणूकदार वापरतात.
गेल्या काही वर्षांत तुम्ही पाहिले असेल, की कधी आयटी क्षेत्र बाजारात वरचढ असते, तर कधी बँकिंग क्षेत्र. कधी वाहन क्षेत्र, तर कधी धातू उद्योग आघाडीवर असतात. संरक्षण क्षेत्र हे सध्या नव्याने आघाडीवर आले आहे.
शेअर बाजारातील गुंतवणूकदार अशा लाटांचा फायदा कंपन्यांची निवड करून करतात; पण म्युच्युअल फंडांमार्फत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना अशा लाटांचा फायदा करून घेण्यासाठी मदतीला येतात ते थीमॅटिक फंड किंवा सेक्टोरल फंड.