
From Bauxite to Profits: Inside NALCO’s Aluminium Production Journey
भूषण ओक
bhushanoke@hotmail.com
नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लि. अर्थात ‘नाल्को’ ही एक नवरत्न दर्जाची केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. अॅल्युमिनियम मूल्य साखळीतील कच्च्या मालापासून तयार उत्पादनापर्यंत सर्व कार्यचालनांचे एकात्मिकरण कंपनीने साध्य केले आहे. खाणकाम, धातू उत्पादन आणि ऊर्जा अशा या मूल्य साखळीतील सर्व क्षेत्रात कंपनी काम करते. त्यामुळे ‘नाल्को’ ही कंपनी सर्वांत मोठ्या एकात्मिक बॉक्साइट-ॲल्युमिना-अॅल्युमिनियम-ऊर्जा-कोळसा संकुलांपैकी एक म्हणून ओळखली जाते आणि सर्वांत कमी खर्चात बॉक्साइट आणि ॲल्युमिना उत्पादन करण्यात जगभरात आघाडीवर आहे. वेदांता ही ॲल्युमिना आणि अॅल्युमिनियम उत्पादनाच्या बाबतीत भारतातील ‘नाल्को’पेक्षा मोठी कंपनी असली तरी कार्यचालन आणि आर्थिक परिमाणांच्या दृष्टिकोनातून ‘नाल्को’ खूपच पुढे आहे.
‘नाल्को’या कंपनीच्या शेअरचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख....