
सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने (एनपीपीए) ३७ आवश्यक औषधांच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी कमी केल्या आहेत. यामध्ये पॅरासिटामॉल, एटोरवास्टॅटिन आणि अमोक्सिसिलिन सारख्या औषधांचा समावेश आहे. ज्यांचा वापर हृदय, मधुमेह आणि संसर्गाशी संबंधित आजारांमध्ये सर्वाधिक केला जातो.