Premium|Natural Gas Prices : नैसर्गिक वायूच्या भावामध्ये का जाणवतो फरक?

Why Natural Gas Prices Differ Across Global Markets : आशिया आणि युरोपमधील नैसर्गिक वायूचे भाव वाढले, तरी एमसीएक्सवरील भावात तितकीशी वाढ झाली नाही. हेनरी हब, एलएनजी आयात आणि भारतातील भावनिर्धारणामुळे हा फरक निर्माण होतो.
Natural Gas Prices

Natural Gas Prices

esakal

Updated on: 

ऋषिकेश उगले - rushikesh.ugale@mcqube.in

कच्च्या तेलाचे भाव वाढले, की त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलवर दिसतो; मात्र नैसर्गिक वायूच्या बाबतीत चित्र वेगळे आहे. पश्‍चिम आशियातील संघर्षामुळे आशिया आणि युरोपमध्ये नैसर्गिक वायूच्या भावात मोठी वाढ झाली, त्याचा परिणाम भारतातील ‘सीएनजी’च्या भावावरही झाला. पण त्याच काळात अमेरिकेतील ‘हेनरी हब’वर आधारित ‘एमसीएक्स’वरील नैसर्गिक वायूच्या भावात तितकीशी हालचाल दिसली नाही. एकाच इंधनाचे भाव वेगवेगळ्या बाजारांत एवढे वेगळे का असतात, याचा घेतलेला वेध...

अमेरिका-इराण संघर्षाला सहा महिने उलटले. या काळात पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायूसह विविध इंधनांच्या भावात चढ-उतार दिसून आले. पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा तुलनेने सुरळीत राहिला; मात्र नैसर्गिक वायूच्या उपलब्धतेवर त्याचा परिणाम झाला. व्यावसायिक क्षेत्राला होणारा गॅसपुरवठा कमी करून घरगुती ग्राहकांना प्राधान्य देण्यात आले. परिणामी, शहर गॅस वितरण कंपन्यांवरील खर्चाचा दबाव वाढला आणि काही ठिकाणी ‘सीएनजी’च्या किरकोळ भावातही वाढ झाली. या दरम्यान एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातील नैसर्गिक वायूचे भाव वाढत असताना, मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवरील (एमसीएक्स) नैसर्गिक वायूच्या वायदे भावात तितकीच वाढ का दिसली नाही? कारण ‘एमसीएक्स’वरील नैसर्गिक वायूचा करार अमेरिकेतील ‘हेनरी हब’ या बाजारभावावर आधारित आहे, तर भारतातील गॅसचे भाव ठरवताना देशांतर्गत उत्पादन, आयात केलेला ‘एलएनजी’ आणि विविध आंतरराष्ट्रीय निर्देशांकांचा परिणाम होतो. म्हणजेच, पंपावरील ‘सीएनजी’चा भाव आणि ‘एमसीएक्स’वरील नैसर्गिक वायूचा भाव यांच्यात थेट एकास एक संबंध नसतो. हा फरक का निर्माण होतो, हे समजून घेण्यासाठी नैसर्गिक वायूचे जागतिक बाजार आणि भारतातील भावनिर्धारणाची रचना समजून घेणे आवश्यक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com