Premium|Navratri Investment Planning : नवदुर्गेच्या नऊ रूपांतून गुंतवणुकीचे धडे; आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी नियोजन

Navratri Investment Planning: नवरात्रीतील नवदुर्गेच्या नऊ रूपांप्रमाणे आर्थिक नियोजनाचे नऊ धडे शिकता येतात. नियमित बचत, योग्य गुंतवणूक, जोखीम व्यवस्थापन आणि भविष्यातील उद्दिष्टांसाठी आर्थिक शिस्त महत्त्वाची ठरते.
Navratri Investment Planning

Navratri Investment Planning

esakal

Updated on: 

दीपाली मुजुमदार - deepalimujumdar@gmail.com

नवरात्र म्हणजे शक्ती, श्रद्धा आणि नवचैतन्याचा उत्सव. देवीच्या नऊ रूपांची आराधना करताना सकारात्मकतेचा संकल्प केला जातो. याच नऊ रूपांकडून आर्थिक नियोजनाचेही काही महत्त्वाचे धडे घेता येतात. उत्पन्नातील ठराविक रक्कम नियमितपणे बाजूला काढणे, योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे, जोखीम समजून घेणे आणि भविष्यातील उद्दिष्टांसाठी आजपासून तयारी करणे, ही आर्थिक समृद्धीची मूलभूत तत्त्वे आहेत. नवरात्रातील नऊ रात्रींच्या निमित्ताने गुंतवणुकीच्या नऊ महत्त्वाच्या बाबी समजून घेऊ या.

वरात्रोत्सवात आपण नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची उपासना करतो, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याच्या विविध गरजांसाठी आजपासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. शिक्षण, घर, व्यवसाय, मुलांचे भविष्य, निवृत्ती आणि आकस्मिक गरजा या प्रत्येकासाठी केलेली शिस्तबद्ध आर्थिक गुंतवणूक म्हणजे आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी केलेली एक प्रकारची आराधनाच आहे. श्रद्धा आपल्याला मानसिक बळ देते; तर योग्य गुंतवणूक आर्थिक बळ देते. आजच्या काळात उत्पन्न किती आहे यापेक्षा त्यातील किती रक्कम आपण योग्य पद्धतीने भविष्यासाठी राखून ठेवतो, हे अधिक महत्त्वाचे आहे. छोट्या रकमेपासून सुरू केलेली नियमित बचत आणि योग्य आर्थिक नियोजन कालांतराने मोठा आधार निर्माण करू शकते. त्यामुळे गुंतवणुकीसाठी मोठ्या रकमेची वाट पाहण्यापेक्षा लवकर सुरुवात करणे आणि सातत्य राखणे अधिक महत्त्वाचे आहे. नवरात्रातील दीप ज्याप्रमाणे अंधार दूर करतो, त्याचप्रमाणे आर्थिक शिस्त भविष्यातील अनिश्चिततेचा अंधार कमी करू शकते. मात्र, गुंतवणूक करताना केवळ आकर्षक परताव्याच्या आशेने निर्णय न घेता आपली उद्दिष्टे, जोखीम स्वीकारण्याची क्षमता, कालावधी आणि आर्थिक परिस्थिती यांचा विचार करणे गरजेचे आहे. नवरात्रीत आपण दुर्गेच्या नऊ रूपांची (नवदुर्गा) पूजा करतो, त्याचप्रमाणे आपल्या गुंतवणुकीच्या प्रवासात नऊ महत्त्वाच्या तत्त्वांचा अवलंब करून आपण आपले आर्थिक भविष्य सुरक्षित करू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com