

Nomination In Bank Accounts
Sakal
संपत्ती कोणताही वादविवाद न होता वारसांकडे विनासायास हस्तांतरित व्हावी असे वाटत असेल, तर नैसर्गिक उत्तर ‘इच्छापत्र करा’ असेच येईल; पण या इच्छापत्राची अंमलबजावणी करताना बऱ्याच वेळा कायदेशीर बाबींची पूर्तता करताना खूप कालावधी जातो. तोपर्यंत संपत्ती पडून राहू शकते. मग किमान ठेवी स्वरूपातील संपत्ती इच्छापत्राप्रमाणे किंवा इच्छापत्राशिवाय हस्तांतर करण्यासाठी सोपा पर्याय म्हणजे नामनिर्देशन (नॉमिनेशन.)
मान ठेवी स्वरूपातील संपत्ती इच्छापत्राप्रमाणे किंवा इच्छापत्राशिवाय हस्तांतर करण्यासाठी सोपा पर्याय म्हणजे नामनिर्देशन (नॉमिनेशन.) नामनिर्देशन हे वैयक्तिक (‘जॉइंट’ सह) खात्यांसाठीच लागू असते. म्हणजेच भागीदारी संस्था, कंपनी, विश्वस्त संस्था वगैरेंच्या खात्यांना नामनिर्देशनाची सोय नसते.