

Statutory Tax Compliance: Decoupling Deadlines Under the New Income Tax Act 2026
Sakal
ॲड. सुकृत देव, करसल्लागार
केंद्र सरकारने एक एप्रिल २०२६पासून नवा प्राप्तिकर कायदा लागू केला आहे. यातील तरतुदींमुळे करकायद्याचे पालन करणे अधिक सुलभ आणि सुटसुटीत झाले आहे. यातील तरतुदींनुसार, प्राप्तिकर विवरणपत्र आर्थिक वर्ष २०२५-२०२६ (आकारणी वर्ष २०२६-२७) भरण्याची मुदत पात्र करदात्यांच्या विभागानुसार वेगवेगळी आहे. विलंबशुल्क भरून विवरणपत्र भरणेही शक्य आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्राप्तिकर विवरणपत्र योग्य माहितीसह भरणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी घाईघाईने विवरणपत्र भरण्याऐवजी सर्व आवश्यक माहिती घेऊन, पडताळणी करून वेळेत विवरणपत्र भरणे अधिक लाभदायक आहे.