

New Sugar Rule Before Ganesh Chaturthi and Diwali; Keep More Than 15 Days’ Stock and Face Action
ESakal
जर तुम्ही मिठाई, बेकरी, बिस्किट, कन्फेक्शनरी किंवा शीतपेयांच्या व्यवसायात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सणासुदीच्या काळात साखरेची साठेबाजी आणि वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. मोठ्या प्रमाणात साखरेचा वापर करणाऱ्या मोठ्या व्यवसायांना आता निर्धारित मर्यादेपलीकडे साखरेचा साठा करणे कठीण जाऊ शकते. नवीन नियमांनुसार, निर्धारित मर्यादेपलीकडे साखरेची साठेबाजी केल्यास कारवाई होऊ शकते.