

Nifty Capital Market Index
esakal
प्रमोद पुराणिक - pramodpuranik५@gmail.com
भांडवली बाजाराशी संबंधित कंपन्यांच्या वाढीचा वेध घेण्यासाठी ‘निफ्टी कॅपिटल मार्केट निर्देशांक’ हा महत्त्वाचा मानदंड ठरत आहे. शेअर बाजार, म्युच्युअल फंड, डिपॉझिटरी, एक्स्चेंज, वेल्थ मॅनेजमेंट आणि भांडवली बाजाराशी निगडित इतर वित्तीय सेवा कंपन्यांची कामगिरी या निर्देशांकातून प्रतिबिंबित होते. त्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणुकीचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांनी या निर्देशांकाची माहिती करून घेणे उपयुक्त ठरते.
राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) तयार केलेला ‘निफ्टी कॅपिटल मार्केट निर्देशांक’ हा भांडवली बाजाराशी संबंधित कंपन्यांच्या कामगिरीचे प्रतिनिधित्व करणारा निर्देशांक आहे. या निर्देशांकामध्ये एकूण २० प्रमुख कंपन्यांची निवड केली जाते. मात्र, या निवडीसाठी संबंधित कंपन्या ‘निफ्टी ५००’ निर्देशांकातील असणे आवश्यक आहे; तसेच प्रत्येक कंपनीचे उपलब्ध बाजारमूल्यांकन (फ्री-फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन) आणि त्याची सहा महिन्यांची सरासरी विचारात घेतली जाते. त्यामुळे या निर्देशांकातील कंपन्या तुलनेने मोठ्या, स्थिर आणि क्षेत्रातील अग्रगण्य मानल्या जातात.