स्मार्ट विश्‍लेषण : ‘निफ्टी आयटी’ निर्णायक वळणावर

रुपयातील कमजोरी असूनही आयटी निर्देशांक मार्च २०२१च्या पातळीवर; एआयमुळे पारंपरिक आउटसोर्सिंग मॉडेलवर दबाव, पण नव्या डिजिटल सेवांत संधी
Structural Dilemma: Weak Rupee Fails to Fuel IT Exports Amid Western Spending Cuts

Structural Dilemma: Weak Rupee Fails to Fuel IT Exports Amid Western Spending Cuts

Sakal

Updated on

ऋत्विक जाधव, तांत्रिक विश्‍लेषक

सध्या ‘निफ्टी आयटी’ निर्देशांकात मोठी घसरण दिसून येत असून, हा निर्देशांक पुन्हा मार्च २०२१ मधील पातळीवर येऊन पोहोचला आहे. गेल्या एका वर्षात ‘सेन्सेक्स’, ‘निफ्टी’ने चांगली वाढ दर्शवली असताना आयटी क्षेत्राने जवळपास सर्व वाढ गमावली असून, हे क्षेत्र बाजाराच्या तुलनेत कमकुवत कामगिरी करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, या कालावधीत भारतीय रुपयामध्ये डॉलरच्या तुलनेत घसरण झाली आहे. सामान्यतः रुपयातील कमजोरी ही आयटी क्षेत्रासाठी सकारात्मक मानली जाते, कारण भारतीय आयटी कंपन्यांचा मोठा महसूल डॉलरमध्ये मिळतो. तरीदेखील आयटी क्षेत्रामध्ये अपेक्षित तेजी दिसून आलेली नाही. यावरून केवळ चलनवाढीचा फायदा पुरेसा नसून, या क्षेत्रासमोर काही मोठी संरचनात्मक आव्हाने उभी असल्याचे स्पष्ट होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com