
प्रमोद पुराणिक
pramodpuranik5@gmail.com
ज्या गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची मानसिकता आहे, त्याच गुंतवणूकदारांनी ‘निफ्टी मायक्रो कॅप २५०’ इंडेक्सचा विचार करावा. या इंडेक्समधील चढ-उतार सर्वांना सहन होणार नाहीत. त्यात जास्त जोखीम आहे. परंतु, जोखीम घेतली, तरच पैसा कमवता येतो. लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप असे विविध प्रकार गुंतवणुकीसाठी विचारात घेतल्यानंतर मगच ‘मायक्रो कॅप’कडे यायला हवे. मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केलेली असेल, तर क्षेत्रबदल म्हणून ‘मायक्रो कॅप इंडेक्स फंडा’चा विचार करता येईल. या निर्देशांकाचा थोडक्यात परिचय करून देत आहे.