निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक गुंतवणुकीची आकर्षक संधी

PSU Banks Shine: क्षेत्रातील मूलभूत बळकटी आणि गुंतवणूकदारांचा विश्वास दिसून येतो. ही स्थिरता मजबूत कर्जवाढ, सुधारित मालमत्ता गुणवत्ता आणि अग्रगण्य सार्वजनिक बँकांच्या ठोस नफाक्षमतेच्या पार्श्वभूमीवर दिसून येते. पायाभूत सुविधा विकासाची गती; तसेच सरकारचा बँकिंग क्षेत्रातील सुधारणांवर आणि भांडवली साह्यावर असलेला भर, या क्षेत्राच्या मूलभूत बाबींना बळ देत आहे.
Investors Eye Nifty PSU Bank Index for Long-Term Growth Potential

Investors Eye Nifty PSU Bank Index for Long-Term Growth Potential

Sakal

Updated on

-ऋत्विक जाधव, टेक्निकल ॲनालिस्ट

नि फ्टी पीएसयू बँक निर्देशांक, जो देशातील सार्वजनिक क्षेत्रातील (पीएसयू) १२ अग्रगण्य बँकांच्या कामगिरीचा मागोवा घेतो. हा निर्देशांक अलीकडे उल्लेखनीय बळकटी आणि तेजी दर्शवत आहे. त्यामुळे सध्याच्या पातळीवर हा निर्देशांक गुंतवणुकीसाठी आकर्षक संधी ठरतो. हा निर्देशांक फ्री फ्लो बाजार भांडवलावर आधारित असून, यात प्रामुख्याने स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक यांसारख्या मोठ्या बँकांचा समावेश आहे. निफ्टी ५० आणि निफ्टी बँक यांसारखे प्रमुख निर्देशांक काही काळ करेक्शन आणि चढ-उतार अनुभवत असताना, पीएसयू बँकांनी स्थिरता दाखवली. यावरून या क्षेत्रातील मूलभूत बळकटी आणि गुंतवणूकदारांचा विश्वास दिसून येतो. ही स्थिरता मजबूत कर्जवाढ, सुधारित मालमत्ता गुणवत्ता आणि अग्रगण्य सार्वजनिक बँकांच्या ठोस नफाक्षमतेच्या पार्श्वभूमीवर दिसून येते. पायाभूत सुविधा विकासाची गती; तसेच सरकारचा बँकिंग क्षेत्रातील सुधारणांवर आणि भांडवली साह्यावर असलेला भर, या क्षेत्राच्या मूलभूत बाबींना बळ देत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com