
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज, ११ ऑगस्ट २०२५ रोजी संसदेत नवीन आयकर विधेयक २०२५ सादर केले आहे. निर्मला सीतारमण यांनी सोमवारी लोकसभेत आयकर विधेयकाची सुधारित आवृत्ती सादर केली. ज्यामध्ये बैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या बहुतेक शिफारशींचा समावेश आहे. या विधेयकात अनेक नवीन बदल करण्यात आले आहेत, ज्याचा परिणाम सामान्य करदात्यांनाही होईल. गेल्या आठवड्यात सरकारने आयकर विधेयक, २०२५ मागे घेण्याच्या निर्णयानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.