

Record High: NSE Data Shows Funded Positions Cross ₹1 Lakh Crore Milestone
Sakal
ॲड. सुनील टाकळकर, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व विमा सल्लागार
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (एनएसई) ताज्या आकडेवारीनुसार, भारतीय शेअर बाजारातील ‘आउटस्टँडिंग फंडेड पोझिशन्स’ने एक लाख कोटी रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. याचा अर्थ, गुंतवणूकदारांनी स्वतःच्या भांडवलाव्यतिरिक्त ब्रोकरकडून कर्ज घेऊन (लिव्हरेज) केलेली गुंतवणूक विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. हे बाजारातील वाढत्या विश्वासाचे लक्षण असले, तरी त्यामागील कायदेशीर गुंतागुंत आणि भविष्यातील जोखीम समजून घेणे आवश्यक आहे.