
मकरंद विपट- ‘सेबी’ रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट
ले मन ट्री हॉटेल्स लि. ही देशातील मध्यम किमतीची सर्वांत मोठी आणि एकूण तिसरी सर्वांत मोठी हॉटेल साखळी आहे. ती ५० हून अधिक ठिकाणी १०,३१७ खोल्या असलेली ११२ हॉटेल चालवते. भूतान, नेपाळ आणि दुबईमध्ये वाढती आंतरराष्ट्रीय उपस्थिती असलेल्या ऑरिका, लेमन ट्री आणि रेड फॉक्ससह उच्च, मध्यम आणि परवडणाऱ्या दरातील ब्रँडचे व्यवस्थापन करते.