कमर्शियल LPG मध्ये मोठा बदल! आता १० किलोचे सिलेंडर मिळणार; व्यावसायिकांची अडचण दूर होणार

Commercial LPG Cylinder News: सरकारी तेल कंपन्या व्यावसायिक वापरकर्त्यांना १०-किलोग्रॅम वजनाचे हलके एलपीजी सिलिंडर देण्याचा विचार करत आहेत. लहान व्यवसाय आणि रेस्टॉरंट मालकांना दिलासा मिळणार आहे.
Commercial LPG Cylinder

Commercial LPG Cylinder

ESakal

Updated on

इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांसारख्या भारताच्या सरकारी तेल विपणन कंपन्या व्यावसायिक एलपीजी बाजारपेठेत एक मोठा बदल घडवून आणण्याची योजना आखत आहेत. एका अहवालानुसार, या तेल कंपन्या व्यावसायिक वापरासाठी १०-किलोग्राम वजनाचे हलके एलपीजी सिलिंडर सादर करण्याच्या तयारीत आहेत. आतापर्यंत व्यावसायिक क्षेत्रात प्रामुख्याने १९ किलोग्राम किंवा त्याहून अधिक वजनाच्या सिलिंडरचेच वर्चस्व होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com