
ऑनलाइन गेमिंग कायदा २०२५:
E sakal
Online Gaming Law to Curb Addiction, Protect Players in India
Winzo-IEIC Report Highlights \$910 Billion Gaming Growth by 2029
ॲड. सायली गानू-दाबके
contact@lexonomix.com
विंझो गेम्स व ‘इंटरॅक्टिव्ह एंटरटेनमेंट आणि इनोव्हेशन कौन्सिल’ (IEIC) यांनी मार्च २०२५मध्ये सादर केलेल्या एका अहवालानुसार, वर्ष २०२९ पर्यंत भारतातील ऑनलाइन गेमिंग क्षेत्रातील उलाढाल ९१० कोटी अमेरिकी डॉलरपर्यंत वाढेल. या क्षेत्रातील २०२४ पर्यंतच्या ३७० कोटी डॉलरच्या गुंतवणुकीपैकी ३०० कोटी डॉलर ही थेट परकी गुंतवणूक आहे. या क्षेत्रातील सर्वांत मोठा भाग हा पैशांची देवघेव होणाऱ्या खेळांचा आहे, तसेच या गेम्सच्या आहारी जाऊन अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याशिवाय मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे आढळले आहे. या आणि अशा अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठी या क्षेत्रावर नियमन असणे गरजेचे होते. त्यासाठी सरकारने ऑनलाइन गेमिंग कायदा विधेयक आणले. नुकत्याच संपलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑनलाइन गेमिंगच्या नियमनासाठीचे विधेयक दोन्ही सभागृहांत सादर होऊन मंजूर झाले. हे विधेयक ऑनलाइन खेळांमधील दिशाभूल करणाऱ्या व आर्थिकदृष्ट्या धोकादायक अशा खेळांपासून नागरिकांना वाचविण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. सरसकट सर्वच ऑनलाइन खेळांना चुकीचे न ठरवता, ज्यात कोणत्याही प्रकारची आर्थिक जोखीम नाही, अशा करमणुकीवर भर असलेल्या ऑनलाइन खेळांना प्रोत्साहन या कायद्याने मिळणार आहे.