
सुहास राजदेरकर, suhas.rajderkar@gmail.com
कोणतेही युद्ध हे मानवतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत दु:खद आणि विनाशकारीच असते. युद्ध हा कोणत्याही प्रश्नावरचा उपाय नाही. त्याने कोणतेच प्रश्न सुटत नाहीत, उलट वाढतात. महाभारत आणि रामायणातदेखील हाच संदेश दिसून येतो.
महाभारतामध्ये श्रीकृष्णालासुद्धा ते टाळता आले नाही. सर्व पर्याय संपल्यानंतर त्याने अर्जुनाला शस्त्र हाती घ्यायला लावले. रामायणातसुद्धा श्रीरामाने रावणाला योग्य मार्गावर चालण्याची संपूर्ण संधी दिली आणि त्याने ती धुडकावल्यानंतरच प्रत्यक्ष युद्ध केले.
मात्र, युद्धाचा सामाजिक, आर्थिक पातळीवर खूप गंभीर परिणाम होतो. देशाची आर्थिक घडी विस्कटते आणि देश मागे ढकलला जातो. युद्ध आणि अर्थव्यवस्था या अनुषंगाने सध्याच्या परिस्थितीचा घेतलेला हा वेध...