
डॉ. दिलीप सातभाई, dvsatbhaiandco@gmail.com
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी २५ नोव्हेंबर २०२४ रोजी ‘पॅन २.०’ उपक्रम सुरू केल्याची घोषणा केली. आता नव्या पॅनकार्डवर क्यूआर कोड असेल, त्यामुळे सुरक्षितता वाढेल, त्याचबरोबर कामही वेगवान होईल. अर्थात, या नव्या योजनेच्या घोषणेमुळे पॅनधारकांमध्ये संभ्रम वाढला आहे. जुने पॅनकार्ड आता चालणार की नाही, असे अनेक प्रश्न त्यांना सतावत आहेत. या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न.