
ॲड. रोहित एरंडे, rohiternade@hotmail.com
न्यायालय हे असे ठिकाण आहे, जिथे लोकांचे मुखवटे दूर होऊन खरे चेहरे समोर येतात आणि मालमत्ता असली तरी त्रास आणि नसली तरी त्रास, याची प्रचिती देणाऱ्या अनेक घटना कोर्टात बघायला मिळतात. ‘वंध्यत्वं तु समिचिनं कुपुत्रो दुखःदायकः’ म्हणजे ‘एक वेळ संतती नसली तरी चालेल; पण कुपुत्र (कुपुत्री) अत्यंत दुःख देणारा ठरतो.’ या श्री भागवत महापुराणातील श्लोकाची प्रचितीही येथे येते.