

IPPB to offer doorstep digital life certificate (Jeevan Pramaan) service
Sakal
Goverment Pension Scheme : भारतीय पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (EPFO) यांनी एक महत्त्वपूर्ण भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे आता निवृत्त पेंशनधारक नागरिकांना “डिजिटल लाइफ सर्टिफिकेट” (Digital Life Certificate) घरबसल्या सादर करता येणार आहे. हे प्रमाणपत्र Employees’ Pension Scheme, 1995 अंतर्गत पेन्शनधारकांसाठी आवश्यक असते.