Post Office Scheme : 5 लाखांच्या गुंतवणुकीवर 10 लाख मिळतील, पोस्ट ऑफीसची ही स्कीम सगळ्यात भारी...

सुरुवातीला ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी होती, मात्र आता कोणताही भारतीय नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतो.
10 lakhs on an investment of 5 lakhs this post office scheme is the heaviest
10 lakhs on an investment of 5 lakhs this post office scheme is the heaviestSakal

तुम्ही लाँग टर्म गुंतवणुकीसाठी चांगले पर्याय शोधत असाल तर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये अनेक चांगल्या योजना मिळतील. किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) हे त्यापैकीच एक आहे. लाँग टर्म आर्थिक बचतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सरकारने 1988 मध्ये ही योजना सुरू केली.

सुरुवातीला ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी होती, मात्र आता कोणताही भारतीय नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतो. सध्या या योजनेवर 7.5 टक्के दराने व्याज दिले जात आहे. KVP योजना 115 महिन्यांत म्हणजे 9 वर्ष आणि 7 महिन्यांत तुमची गुंतवणूक दुप्पट करण्याची हमी देते. जर तुम्ही या योजनेत 5 लाख गुंतवले, तर 115 महिन्यांनंतर ते मॅच्युअर झाल्यावर तुम्हाला परतावा म्हणून 10 लाख मिळतील.

KVP मध्ये गुंतवणूक फक्त 1000 रुपयांपासून सुरू करता येते. जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. पण जर तुम्ही यामध्ये 50,000 रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला पॅन कार्ड देणे बंधनकारक आहे.

मनी लाँड्रिंगची शक्यता टाळण्यासाठी, सरकारने 2014 मध्ये किसान विकास पत्रमध्ये 50 हजारांपेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी पॅन कार्ड अनिवार्य केले आहे. जर तुम्हाला 10 लाख किंवा त्याहून अधिक गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला पोस्ट ऑफिसला सॅलरी स्लिप, ITR, बँक स्टेटमेंट आणि इत्यादींसारखी काही कागदपत्रे द्यावी लागतील.

10 lakhs on an investment of 5 lakhs this post office scheme is the heaviest
Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या 'या' स्कीममध्ये दर महिना 1,000 रुपयांची गुंतवणूक करा; तयार करा 8 लाखाचा फंड, कसा ते जाणून घ्या?

ज्या लोकांकडे एकरकमी पैसे आहेत पण त्यांना त्या पैशाची कोणतीही जोखीम घ्यायची नाही आणि येत्या काळात या पैशाची गरज नाही अशा लोकांसाठी किसान विकास पत्र एक चांगला पर्याय ठरू शकतो.

18 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती या योजनेअंतर्गत सिंगल किंवा जॉइंट खाते उघडू शकते. याशिवाय 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचे मूल त्याच्या/तिच्या नावावर किसान विकास पत्र घेऊ शकते. पालक अल्पवयीन मुलांच्या वतीने खाते उघडू शकतो. अनिवासी भारतीयांना त्यात गुंतवणूक करण्याची परवानगी नाही. खाते उघडताना, आधार कार्ड, वय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, KVP अर्ज फॉर्म इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असू शकते.

10 lakhs on an investment of 5 lakhs this post office scheme is the heaviest
BlackBuck IPO : 'हा' स्टार्टअप लवकरच आणणार 550 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घेऊ...

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com