Bank of Baroda
Bank of BarodaSakal

Bank of Baroda: बँक ऑफ बडोदाची मोठी कारवाई, 11 मॅनेजर्ससह 60 हून अधिक कर्मचाऱ्यांना केले निलंबित

Bank of Baroda: आरबीआयने BOB वर्ल्ड अॅपवर नवीन ग्राहक जोडण्यावर बंदी घातली आहे.

Bank of Baroda: RBI ने बँक ऑफ बडोदावर मोठी कारवाई केली होती. RBI ने बँक ऑफ बडोदाच्या BoB वर्ल्ड अॅपवर नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली होती. या आदेशानंतर नवीन ग्राहक ‘BoB वर्ल्ड’ अॅपमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. बँक ऑफ बडोदाने मोबाईल बँकिंगसाठी ‘BoB वर्ल्ड’ नावाने स्वतःचे मोबाइल अॅप तयार केले आहे.

RBI ने BoB वर्ल्ड अॅपवर ग्राहकांचा चुकीच्या पद्धतीने समावेश केल्यामुळे कारवाई केली होती. या कारवाईनंतर बँक ऑफ बडोदा (BoB) ने या प्रकरणात दोषी आढळलेल्या 60 हून अधिक कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यापैकी 11 एजीएम (असिस्टंट जनरल मॅनेजर) आहेत. ही बाब बँकेच्या BoB वर्ल्ड अॅपच्या ऑडिटशी संबंधित आहे.

निलंबनाच्या पत्रात बँकेने BoB वर्ल्ड अॅपमध्ये अनियमितता झाल्याचे मान्य केले आहे. काही कर्मचार्‍यांनी ग्राहकांच्या संमतीशिवाय बँक खात्यातील नंबर BoB वर्ल्ड अॅपमध्ये टाकले होते.

Bank of Baroda
RBI Penalty: RBI ची मोठी कारवाई, ICICI बँक आणि कोटक महिंद्रा बँकेला ठोठावला 16.14 कोटींचा दंड

बँकेचे म्हणणे आहे चौकशीअंती दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार निलंबित करण्यात आलेले बहुतांश कर्मचारी हे वडोदरा भागातील आहेत. बँक लखनौ, भोपाळ, राजस्थान आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या काही शाखांमध्ये अशीच कारवाई करू शकते.

बँकेने 11 एजीएमसह 60 हून अधिक कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. निलंबित कर्मचाऱ्याने सांगितले की, जर कर्मचारी दोषी आढळले तर त्याला दुसरीकडे पोस्टिंग मिळू शकते किंवा त्याची नोकरीही जाऊ शकते.

Bank of Baroda
Diwali Bonus: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार आणखी गोड, मोदी सरकारने जाहीर केला बोनस

बँक ऑफ बडोदा लवकरच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) BoB वर्ल्ड अॅपचे ऑडिट करुन पुढील दोन आठवड्यात अहवाल सादर करू शकते. एका बँक अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आरबीआयने BOB वर्ल्ड अॅपवर नवीन ग्राहक जोडण्यावर बंदी घातली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com