Fake Notes : सावधान! फेडरल बँकेचं प्रकरण ताजं असतानाच आता 'या' बँकेत आढळल्या 100 च्या 11 बनावट नोटा

बनावट नोटा प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.
Janata Bank Ichalkaranji
Janata Bank Ichalkaranji esakal
Summary

गावभाग व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या दोन्ही गुन्ह्यात एकूण २८ बनावट नोटा जप्त केल्या.

इचलकरंजी : फेडरल बँकेतील (Federal Bank) बनावट नोटा (Fake Notes) प्रकरण ताजे असतानाच येथील जनता सहकारी बँकेतही (Janata Cooperative Bank) असाच प्रकार उघडकीस आला. तब्बल शंभर रुपये किमतीच्या ११ नोटा एटीएम कॅश डिपॉझिट मशिनमध्ये भरून चलनात आणल्याप्रकरणी एकावर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दिनेश तानाजी लोहार (रा. लिंबू चौक, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद आण्णासो मलगोंडा नेर्ले (वय ५२) यांनी पोलिसांत दिली. बनावट नोटा प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्याकडे दोन्ही गुन्ह्यांचा तपास गावभागचे पोलिस उपनिरीक्षक भागवत मुळीक यांच्याकडे दिला आहे.

Janata Bank Ichalkaranji
Kunbi Certificate : वाळवा, शिराळ्यात सर्वाधिक कुणबी नोंदी; दुष्काळी तालुक्यांत नोंदीच नाहीत, शासनाला करणार अहवाल सादर

पोलिसातून मिळालेली माहिती अशी, येथील जनता बँकेच्या प्रधान शाखेमध्ये दिनेश लोहार याने कॅश डिपॉझिटमध्ये शंभर रुपयांच्या ६४ नोटा भरल्या. एकूण ६ हजार ४०० रुपयांपैकी एकूण ११ नोटा बनावट असल्याचे समोर आले. बँकेचे नोडल ऑफिसर नेर्ले यांनी याबाबतची तक्रार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली. चार दिवसांपूर्वी लिंबू चौक परिसरात शिवाजीनगर पोलिसांनी बनावट नोटाप्रकरणी कारवाई केल्याची चर्चा होती. याबाबत कारवाई केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, ज्या कारवाईची चर्चा झाली, तेच प्रकरण शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अखेर दाखल झाले.

Janata Bank Ichalkaranji
Sugar Factories : ऊसतोडणी-वाहतूक खर्चात 'दालमिया' उच्चांकी; 'हुतात्मा'चा सर्वात कमी खर्च, कारखान्यांकडून FRP अदा

दरम्यान, तपास अधिकारी पोलिस निरीक्षक मुळीक यांनी बनावट गावभाग व शिवाजीनगर पोलिसांतील बनावट नोटा प्रकरणातील संशयित प्रशांत पाटील व दिनेश लोहार यांना ताब्यात घेतले आहे. दोघांकडे याप्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यातील जप्त केलेल्या शंभर रुपयांच्या एकूण २८ नोटा जप्त केल्या आहेत. राज्यातील विविध बनावट नोटा गुन्ह्यातील धागेदोरे इचलकरंजी शहराशी जोडले आहेत. त्यादृष्टीने आता या दोन्ही प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.

Janata Bank Ichalkaranji
Karnataka Politics : कर्नाटकातील काँग्रेस सरकार कोसळणार? मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, पाच वर्षे मीच..

ना वॉटरमार्क, ना सुरक्षा धागा

गावभाग व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या दोन्ही गुन्ह्यात एकूण २८ बनावट नोटा जप्त केल्या. या नोटा पूर्णता बनावट असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या नोटांवर वॉटरमार्क नसून सुरक्षा धागाही नाही. या बाबी तपासात समोर आल्या आहेत. तरीही या नोटा पुढील तपासासाठी नाशिक येथील नोट मुद्रणालयात पाठवण्यात येणार असल्याचे तपासाधिकारी मुळीक यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com