FPI : परदेशी गुंतवणूकदारांची १३ हजार कोटींची खरेदी; एकूण गुंतवणूक १५,७०६ कोटींवर

परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) भारतीय शेअर बाजारात नवे आर्थिक वर्ष २०२४-२५ सुरू झाल्यापासून १२ एप्रिलपर्यंत १३ हजार ३४७ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली आहे.
fbi
fbisakal

मुंबई : परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) भारतीय शेअर बाजारात नवे आर्थिक वर्ष २०२४-२५ सुरू झाल्यापासून १२ एप्रिलपर्यंत १३ हजार ३४७ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली आहे.

याशिवाय कर्जरोख्यांसह अन्य पर्यायांमध्ये मिळून एकूण १५,७०६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तरीही गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत त्यांचा खरेदीचा वेग आता कमी झाला असल्याचे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि.ने (एनएसडीएल) म्हटले आहे.

परदेशी गुंतवणूकदारांनी नव्या आर्थिक वर्षाची जोरदार सुरुवात करत भारतीय बाजारपेठांमध्ये खरेदी वाढविली, तरी सध्या त्यांचा खरेदीचा वेग मंदावला आहे. भारत-मॉरिशसमधील कराबाबतच्या करारामुळे ‘एफपीआय’ने हे पाऊल उचलले आहे.

नजीकच्या काळातही हाच कल राहण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या कराराच्या तपशिलाबाबत स्पष्टता येईपर्यंत नजीकच्या काळात ‘एफपीआय’च्या प्रवाहावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे मत ‘जिओजित फायनान्शियल’चे तज्ज्ञ डॉ. व्ही के विजयकुमार यांनी व्यक्त केले.

गेल्या आठवड्यात परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) भारतीय शेअर बाजारात विक्रीवर भर दिला, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) खरेदी सुरू ठेवली, त्यामुळे गुंतवणुकीचे संतुलन साधले गेले.

गेल्या आठवड्यात पाचपैकी चार सत्रांमध्ये ६,५२६ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सर्व सत्रांमध्ये मिळून एकूण १२,२३२.६१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. स्थूल आर्थिक घटक,

सार्वत्रिक निवडणुका, मोठ्या कंपन्यांची चांगले आर्थिक निकाल, उत्तम कमाई यामुळे भारतीय शेअरचे भाव योग्य असल्याने पुढील दोन-तीन वर्षांत भारताला जागतिक उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये अव्वल स्थानावर येण्यासाठी चांगली संधी आहे, असे विश्लेषकांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com