
उत्तर भारतातील 15,200 पेक्षा अधिक रुग्णालयांनी बजाज अॅलिअन्झसोबतची कॅशलेस सुविधा 1 सप्टेंबरपासून बंद केली.
रुग्णालयांचा आरोप – कंपनीचे जुने दर आहे, एकतर्फी कपात केली जाते आणि पेमेंट उशीरा मिळते.
आता रुग्णांना हॉस्पिटलमध्ये थेट पैसे भरून नंतर रिम्बर्समेंट घ्यावी लागणार आहे.
Bajaj Allianz policyholders: बजाज अॅलिअन्झ हेल्थ इन्शुरन्सच्या लाखो पॉलिसीधारकांसाठी धक्कादायक बातमी आहे. उत्तर भारतातील तब्बल 15,200 रुग्णालयांनी 1 सप्टेंबर 2025 पासून बजाज अॅलिअन्झसोबतची ‘कॅशलेस ट्रीटमेंट’ सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या यादीत मॅक्स हेल्थकेअर, मेदांता यांसारखी मोठी रुग्णालयेसुद्धा आहेत.