Rail Vikas Nigam Ltd : रेल विकास निगम लिमिटेडला 202 कोटीची नवी ऑर्डर, एका वर्षात 344% परतावा...

Rail Vikas Nigam Investment : रेल्वे सेक्टरमधील सरकारी कंपनी रेल विकास निगम लिमिटेडला (RVNL) एक नवीन ऑर्डर मिळाली आहे. कंपनीला दक्षिण पूर्व रेल्वेकडून 202.87 कोटीची ही ऑर्डर प्राप्त झाली आहे.
Rail Vikas Nigam Ltd
Rail Vikas Nigam Ltd Sakal

रेल्वे सेक्टरमधील सरकारी कंपनी रेल विकास निगम लिमिटेडला (RVNL) एक नवीन ऑर्डर मिळाली आहे. कंपनीला दक्षिण पूर्व रेल्वेकडून 202.87 कोटीची ही ऑर्डर प्राप्त झाली आहे. रेल विकास निगम लिमिटेड या प्रोजेक्टसाठी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी म्हणून समोर आली आहे.

कंपनीचे शेअर्स नुकतेच 4 टक्क्यांनी घसरले असून बीएसईवर हा शेअर 543.15 रुपयांवर ट्रेड करत आहे. या घसरणीमुळे कंपनीचे मार्केट कॅप 1.13 लाख कोटी झाले आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी ब्लॉक डील पाहायला मिळाले.

रेल विकास निगम लिमिटेडला (RVNL) देण्यात आलेल्या या नवीन प्रोजेक्टमध्ये खडगपूर विभागातील खरगपूर-भद्रक सेक्शनवरील 2x25 केवी सिस्टममध्ये 132 केवी ट्रॅक्शन सबस्टेशन, सेक्शनिंग पोस्ट (SP) आणि सब-सेक्शनिंग पोस्टचे (SSP) डिझाइन, सप्लाय, स्थापना, टेस्टिंग आणि कमिशनिंगचा समावेश आहे.

कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. हा प्रोजेक्ट 18 महिन्यांच्या कालावधीत एक्झिक्यूट करायचा आहे. एक्सचेंजेसवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, 827 कोटीच्या रेल विकास निगम लिमिटेडचे (RVNL) 1.4 कोटी शेअर्सचे व्यवहार झाले. या अंतर्गत कंपनीच्या 0.7 टक्के होल्डिंगचा व्यवहार झाला.

हा व्यवहार सरासरी 585 रुपये दराने झाला. मात्र, शेअर्स कोणी विकत घेतले आणि कोणी विकले याचा खुलासा होऊ शकला नाही. सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे विकास शेअर्समध्ये ब्लॉक डीलचा हा प्रकार घडला आहे. सोमवारीही 0.8 टक्के होल्डिंगचे व्यवहार झाले. या अंतर्गत 806 कोटी रुपयांच्या शेअर्सचे व्यवहार 560 रुपयांना झाले.

Rail Vikas Nigam Ltd
Titagarh Rail Systems Ltd : टिटागढ रेल सिस्टीम्सच्या शेअर्समध्ये ब्लॉक डील, ब्लॅकरॉकने खरेदी केले 153 कोटीचे शेअर्स...

रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअर्सने कायमच गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. गेल्या एका वर्षात त्याच्या गुंतवणूकदारांनी 344 टक्के इतका मोठा नफा कमावला आहे. गेल्या एका महिन्यात हा शेअर 45 टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या 6 महिन्यांत कंपनीचे शेअर्स 193 टक्क्यांनी वाढले आहेत. शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचे तर मार्च तिमाहीच्या अखेरीस त्यात सरकारचा हिस्सा 72.84 टक्के होता.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com