Bajaj Finance : ‘बजाज फायनान्स’च्या नफ्यात २१ टक्के वाढ ; भागधारकांना प्रतिशेअर ३६ रुपये लाभांश जाहीर

बजाज फायनान्सने ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत ३,८२४ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाही कालावधीत कंपनीने ३,१५७ कोटी रुपयांच्या तुलनेत वार्षिक २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Bajaj Finance
Bajaj Financesakal

मुंबई: बजाज फायनान्सने ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत ३,८२४ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाही कालावधीत कंपनीने ३,१५७ कोटी रुपयांच्या तुलनेत वार्षिक २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीच्या एकूण महसुलातही ३१.३४ टक्के वाढ झाली असून, मार्च २०२४ तिमाहीत १४,९२६ कोटी महसूल मिळवला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत कंपनीने ११,३६४ कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता.

कंपनीने ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर ३६ रुपये अंतिम लाभांश जाहीर केला आहे. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांकडून मंजुरी मिळाल्यावर हा लाभांश २६, २७ जुलै रोजी किंवाआसपास जमा केला जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.

जानेवारी-मार्च या कालावधीत कंपनीने १३,२३० कोटी रुपये एकत्रित व्याज उत्पन्न मिळवले आहे, मागील वर्षीच्या याच कालावधीत ते ९,८४५ कोटी रुपये होते. यात वार्षिक ३४ टक्के वाढ झाली आहे. तर, तिसऱ्या तिमाहीतील १२,५२३ कोटी रुपयांच्या तुलनेत व्याज उत्पन्न ५.६ टक्क्यांनी वाढले आहे.

Bajaj Finance
NIFTY Next 50 : ‘निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्स’वर डेरिव्हेटिव्ह व्यवहारांची सुविधा

संपूर्ण आर्थिक वर्षासाठी, करोत्तर नफा १४,४५१ कोटी रुपये असून, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये तो ११,५०७ कोटी रुपये होता. तर आर्थिक वर्ष २०२४ मध्ये एकूण महसूल ५४,९६९ कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये तो ४१,४१० कोटी रुपये होता. कंपनीच्या एकूण थकीत कर्जांचे प्रमाण (एकूण एनपीए) ३१ मार्च २०२४ तिमाहीत ०.८५ टक्के होते, मार्च २०२३ च्या तिमाहीत ते ०.९४ टक्के होते. निव्वळ ‘एनपीए’ मार्च २०२४ मध्ये ०.३७ टक्के होता. तो मार्च २०२३ तिमाहीत ०.३४ टक्के होता.

कंपनीच्या नव्या कर्जांची संख्या चौथ्या तिमाहीत वार्षिक चार टक्क्यांनी वाढून ७८.७ लाख झाली असून, आर्थिक वर्ष २०२३ च्या याच तिमाहीत ती ७५.६ लाख होती. व्यवस्थापनाखालील मालमत्ता मार्च २०२४ च्या तिमाहीत वार्षिक ३४ टक्क्यांनी वाढून ३,३०,६१५ कोटी रुपये झाली. कंपनीचे निव्वळ व्याज उत्पन्न मार्च २०२४ अखेरच्या तिमाहीत ८,०१३ कोटी रुपये असून, मार्च २०२३ तिमाहीतील ६,२५४ कोटी रुपयांच्या तुलनेत २८ टक्क्यांनी वाढले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com