LIC Policy | एलआयसीच्या या योजनांमध्ये पैसे राहातात सुरक्षित आणि परतावा मिळतो उत्तम 3 best policies of LIC to invest and gain money | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

LIC Policy

LIC Policy : एलआयसीच्या या योजनांमध्ये पैसे राहातात सुरक्षित आणि परतावा मिळतो उत्तम

मुंबई : जिथे आपला पैसा सुरक्षित राहील आणि चांगला परतावाही मिळेल अशा गुंतवणूक योजनांच्या शोधात आपण कायम असतो. सरकारने लोकांसाठी अनेक प्रकारच्या बचत योजना सुरू केल्या आहेत.

एलआयसी प्रत्येक श्रेणीनुसार वेळोवेळी नवीन योजना घेऊन येत असते. १८ वर्षे ते ६५ वर्षे वयोगटातील लोक या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात. अशा प्रकारे, एलआयसीकडे अनेक विमा पॉलिसी आहेत. (3 best policies of LIC to invest and gain money )

LIC मधील गुंतवणूक ही भारतातील सर्वात विश्वासार्ह गुंतवणूक मानली जाते. यामध्ये तुम्हाला लाइफ इन्शुरन्स कव्हरची सुविधाही मिळते. यासोबतच तुमची बचतही होत राहते. हेही वाचा - परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

एलआयसी नवीन जीवन आनंद

LICच्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. यामध्ये तुम्हाला सुरक्षेसोबत रिटर्नची हमीही मिळते. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी वय १८ ते ५० वर्षांच्या दरम्यान असावे.

पॉलिसीची मुदत १५ ते ३५ वर्षांच्या दरम्यान कुठेही असू शकते. या योजनेंतर्गत विमा रक्कम रु. १ लाख ते अमर्यादित रकमेपर्यंत असू शकते आणि परिपक्वतेचे वय ७५ वर्षे आहे.

एलआयसी जीवन उमंग

LIC जीवन उमंग ही संपूर्ण जीवन विमा योजना आहे. जीवन उमंग पॉलिसी ही इतर योजनांपेक्षा अनेक बाबतीत वेगळी आहे. ९० दिवसांपासून ते ५५ वर्षे वयोगटातील लोक ही पॉलिसी घेऊ शकतात.

ही एक एंडॉवमेंट योजना आहे. यामध्ये, लाइफ कव्हरसह, मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कम उपलब्ध आहे. या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते १०० वर्षांपर्यंतचे कव्हरेज प्रदान करते.

मनी-बॅक चाइल्ड प्लॅन

हा एक मनी-बॅक चाइल्ड प्लॅन आहे जो मुलांना आर्थिक सुरक्षा प्रदान करतो. ही पॉलिसी ० ते १२ वर्षे वयोगटातील मुलाच्या वतीने कोणतेही पालक घेऊ शकतात. तुम्ही या प्लॅनमध्ये १ लाख रुपयांपासून अमर्याद रकमेपर्यंत गुंतवणूक करू शकता आणि परिपक्वतेचे वय २५ वर्षे आहे.

टॅग्स :lic policyInvestment