
एकीकडे भारतातील काही लोक आठवड्यात 70 ते 90 दिवस काम करण्याता सल्ला देत असतानाचा ब्रिटनमधील कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी एेतिहासिक निर्णय घेतला आहे. ज्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. युनायटेड किंग्डममधील 200 कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचा पगार कमी न करता आठवड्यातून फक्त चार दिवस काम करण्याचा नियम लागू केला आहे. या बदलाला फोर डे वीक फाउंडेशनचा पाठिंबा आहे आणि मार्केटिंग, तंत्रज्ञान, धर्मादाय संस्था आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांचा यामध्ये मोठा सहभाग आहे.