Stock Investing : 'या' कंपनीला 513 कोटीची ऑर्डर, स्टॉकवर सकारात्मक परिणाम...

एक्सचेंज फायलिंगनुसार, थरमॅक्स ग्रुपच्या उपकंपनीला 513 कोटीच्या ऑर्डर मिळाल्या आहेत.
513 crore order to this company positive effect on the stock
513 crore order to this company positive effect on the stockSakal

हेवी इलेक्ट्रिकल इक्विपमेंट बनवणारी कंपनी थरमॅक्स लिमिटेडचे (Thermax Ltd) शेअर्स कमजोर बाजार सत्रात वाढले आहेत. शेअर्समध्ये झालेली वाढ ऑर्डर मिळाल्याच्या बातम्यांचा परिणाम आहे.

एक्सचेंज फायलिंगनुसार, थरमॅक्स ग्रुपच्या उपकंपनीला 513 कोटीच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या एका कंपनीकडून ही ऑर्डर मिळाली आहे. कंपनीच्या शेअर्सने एका वर्षात त्यांच्या शेअरहोल्डर्सना 140% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

थरमॅक्स लिमिटेडची उपकंपनी Thermax Babcock AND Wilcox Energy Soln Ltd (TBWES) ला जिंदाल एनर्जी बोत्सवाना Pty Ltd कडून ऑर्डर मिळाल्याचे शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत कंपनीने सांगितले.

513 crore order to this company positive effect on the stock
Rail Vikas Nigam Ltd : रेल विकास निगम लिमिटेडला 202 कोटीची नवी ऑर्डर, एका वर्षात 344% परतावा...

या अंतर्गत, कंपनीला दक्षिण आफ्रिकेतील बोत्सवाना इथे 600 मेगावॅटचा ग्रीनफिल्ड ऊर्जा प्रोजेक्ट उभारायचा आहे. या ऑर्डरची किंमत 513 कोटी (सुमारे 61.464 दशलक्ष डॉलर्स) आहे. ऑर्डर 2X 550 TPH बॉयलरच्या पुरवठ्यासाठी आहे. ही ऑर्डर 23 महिन्यांत पूर्ण करायची आहे.

TBWES प्रोजेक्टसाठी डिझायनिंग, इंजिनिअरिंग, उत्पादन, चाचणी, पुरवठा, स्थापना आणि कमिशनिंग आणि कार्यप्रदर्शन चाचणीचे पर्यवेक्षण करेल असे फायलिंगमध्ये म्हटले आहे. थर्मॅक्सने एका निवेदनात म्हटले आहे की, उत्पादित वीज देशाच्या वाढत्या विजेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय उपयोगिता वीज कंपनीला विकण्याचा हेतू आहे.

513 crore order to this company positive effect on the stock
BlackBuck IPO : 'हा' स्टार्टअप लवकरच आणणार 550 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घेऊ...

हा शेअर बीएसईवर शेअर नुकताच 6.90 टक्क्यांनी वाढून 5650 रुपयांवर पोहोचला. स्टॉक रिटर्न्सबद्दल बोलायचे तर, गेल्या 3 महिन्यांत 21 टक्के आणि गेल्या 6 महिन्यांत 70 टक्के वाढ झाली आहे. या शेअरने गेल्या एका वर्षात 142 टक्के आणि गेल्या दोन वर्षांत 170 टक्के परतावा दिला आहे. कंपनीचे मार्केट कॅप 66,841.32 कोटी आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 5697.95 रुपये आहे आणि निचांक 2196.30 रुपये आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com