
टीसीएसने 600 अनुभवी कर्मचाऱ्यांची जॉइनिंग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे, ज्यामुळे अनेक जण बेरोजगार होऊन आर्थिक आणि मानसिक तणावाखाली आहेत.
नायट्स (NITES) ने सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी केली, उमेदवारांसाठी स्पष्ट जॉइनिंग तारीख, आर्थिक भरपाई आणि मानसिक मदतीची मागणी केली आहे.
टीसीएसने ऑफर पाळण्याचे आश्वासन दिले, मात्र जॉइनिंगची वेळ व्यवसायाच्या मागणीनुसार ठरवली जाईल, असे सांगितले.
TCS Delays Onboarding: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) तब्बल 600 अनुभवी लेटरल हायर्सना (Experienced Lateral Hires) जॉइनिंगची तारीख अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याने असंख्य उमेदवार आर्थिक आणि मानसिक संकटात आहेत. कंपनीकडून कोणतीही नवी जॉइनिंगची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, ज्यामुळे या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे.