

Central government employees and pensioners may see a major salary and pension revision as the 8th Central Pay Commission begins reviewing pay structures and invites suggestions through the MyGov portal.
esakal
आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना झाल्यानंतर भारत सरकारने कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक आणि विविध संस्थांकडून सूचना व प्रस्ताव मागवले आहेत. या संदर्भात सरकारने एक सार्वजनिक नोटीस जारी केली आहे. या नोटीसनुसार, केंद्र सरकारने ३ नोव्हेंबर २०२५ रोजी एका ठरावाद्वारे ८ व्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना केली आहे. केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन रचनेचा आढावा घेणे हे या आयोगाचे मुख्य उद्दिष्ट आहे.