

8th Pay Commission: Central government employees may receive an estimated monthly salary hike of ₹15,400 and average arrears of ₹3.40 lakh, according to JP Morgan's report
esakal
आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीकडे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक ब्रोकरेज कंपनी जेपी मॉर्गनने आपल्या अहवालातून पगारवाढ आणि थकबाकीबाबत महत्त्वाचे अंदाज व्यक्त केले आहेत. आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांना दरमहा सरासरी १५ हजार ४०० रुपये अतिरिक्त मिळू शकतात. तसेच प्रत्येक लाभार्थ्याला सरासरी ३ लाख ४० हजार रुपयांच्या आसपास थकबाकी मिळण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.