8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगापूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! DA मध्ये होणार दोनदा वाढ, जाणून घ्या अपडेट

Central Government Employees : आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी येण्यापूर्वी DA मध्ये दोनदा वाढ होण्याची शक्यता आहे. आयोगाला शिफारशी सादर करण्यासाठी १८ महिने (२०२७ च्या पूर्वार्धापर्यंत) कालावधी दिला आहे.
8th Pay Commission

8th Pay Commission

esakal

Updated on

AICPI-IW Data Signals Possible 3% DA Increase : केंद्र सरकारचे कर्मचारी आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, त्या शिफारशी येण्यापूर्वीच त्यांना महागाई भत्त्यात (DA) दोनदा वाढ मिळण्याची शक्यता आहे. आठव्या वेतन आयोगाला सरकारकडे शिफारशी सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे आणि हा कालावधी २०२७ च्या पूर्वार्धात संपणार आहे. यामुळे आयोगाच्या शिफारशी जाहीर होण्यापूर्वी सरकारकडून महागाई भत्त्यात दोनदा वाढ केली जाण्याची अपेक्षा आहे विशेषतः जुलै-डिसेंबर आणि जानेवारी-जून या सहामाही कालावधींसाठी ही वाढ होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com