

Central government employees may see a further increase in Dearness Allowance, with the 8th Pay Commission reviewing salary structure, allowances and pensions
esakal
केंद्र सरकारी कर्मचारी सध्या महागाई भत्त्यातील (DA) पुढील वाढीकडे लक्ष ठेवून आहेत. वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीसाठी म्हणजेच जुलै ते डिसेंबर या कालावधीसाठीची DA वाढ ऑक्टोबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. आठवा वेतन आयोग स्थापन झाल्यानंतर महागाई भत्त्यात वाढ जाहीर होण्याची ही दुसरी वेळ ठरणार आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या DAमध्ये दोन टक्क्यांची वाढ करण्यात आली होती.