

Central government employees discussing expected salary hike and DA revision under the upcoming 8th Pay Commission.
esakal
आठव्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. या वेतन आयोगाच्या माध्यमातून, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्तीवेतनात (पेंशन) मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. कर्मचारी संघटनांनी महागाई भत्त्याच्या (DA) गणना पद्धतीत बदल करण्याची मागणी केली आहे. महागाई भत्त्याच्या गणनेतील बदलांबाबत सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी, हा विषय बऱ्याच काळापासून चर्चेचा मुद्दा बनला आहे.