

Latest update on 8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाची तयारी आता औपचारिकरित्या गतिमान झाली आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची सर्वोच्च प्रतिनिधी संस्था असलेल्या नॅशनल कौन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (एनसी जेसीएम), स्टाफ साईडने त्यांचे निवेदन तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या संदर्भात, २५ फेब्रुवारी २०२६ रोजी नवी दिल्ली येथे मसुदा समितीची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत आठव्या वेतन आयोगाला सादर करायचे प्रस्ताव कसे तयार करायचे हे ठरवले जाईल. महत्त्वाचे म्हणजे, समिती सदस्यांना २५ फेब्रुवारीनंतर सुमारे एक आठवडा दिल्लीत राहून प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यास सांगण्यात आले आहे.