

Central government employees
esakal
केंद्र सरकारचे कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, या प्रतीक्षेच्या काळातच सरकारकडून आलेल्या एका माहितीमुळे अनेक माजी कर्मचाऱ्यांची निराशा झाली आहे. पदोन्नतीशी संबंधित असलेल्या महत्त्वपूर्ण 'MACP' (मॉडिफाइड ॲश्युअर्ड करिअर प्रोग्रेशन) योजनेबाबत सरकारने संसदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, एका विशिष्ट कालावधीत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही.