8th Pay Commission : वेतनवाढीचा मार्ग मोकळा, सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार ४७,६०० होणार? ८ व्या वेतन आयोगाची महत्त्वाची बैठक

Dehradun Meeting : या बैठकीत वेतन, भत्ते, निवृत्तीवेतन आणि सेवाशर्तींवर चर्चा केली जाणार आहे. सूचना सादर करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल २०२६ असून त्या फक्त अधिकृत पोर्टलवरूनच द्याव्या लागतील.
Dehradun Meeting

Officials and stakeholders participating in the 8th Pay Commission meeting in Dehradun

esakal

Updated on

8th Pay Commission Meeting Scheduled in Dehradun : आठव्या वेतन आयोगाची २४ एप्रिल २०२६ रोजी उत्तराखंडची राजधानी देहरादून शहरात बैठक होणार आहे. वेतन, भत्ते आणि सेवेशी संबंधित इतर बाबींच्या संदर्भात विविध संबंधित घटकांशी चर्चा करण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. वेतन, निवृत्तीवेतन, भत्ते आणि सेवाशर्तींशी संबंधित मुद्द्यांबाबत कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, विविध संस्था, संघटना आणि इतर संबंधित घटकांकडून आयोगाने सूचना मागवल्या आहेत. ८ व्या वेतन आयोगाची स्थापना ३ नोव्हेंबर २०२५ रोजी एका शासकीय ठरावाद्वारे करण्यात आली असून, आपल्या शिफारसी सादर करण्यासाठी आयोगाला १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com