

8th Pay Commission meeting, focusing on salary hike, pension and allowance demands
esakal
आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला वर्षभरापेक्षा अधिक कालावधी झाला असून, या काळात आयोगाने विविध कर्मचारी संघटनांशी चर्चा केली आहे. मात्र, अद्याप काही संघटनांना आपल्या मागण्या आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या आयोगासमोर मांडायच्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनने (AIRF) आयोगाच्या अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्याकडे चर्चेसाठी आणखी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे. दुसरीकडे, ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉइज फेडरेशनची (AIDEF) १८ नोव्हेंबर रोजी आठव्या वेतन आयोगासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत संरक्षण विभागातील नागरी कर्मचाऱ्यांच्या वेतनासह पेन्शन, भत्ते, विमा आणि पदोन्नतीसंदर्भातील विविध मागण्या मांडल्या जाणार आहेत.