

8th Pay Commission: Key Decisions on Salary, Pension and Fitment Factor Ahead
Esakal
आठवा वेतन आयोग आता आपल्या १८ महिन्यांच्या कार्यकाळातील दुसऱ्या टप्प्यात पोहोचला असून, केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी आगामी काही महिने महत्त्वाचे ठरणार आहेत. आयोगाने आतापर्यंत विविध हितधारकांशी नऊ महिन्यांहून अधिक काळ चर्चा आणि सल्लामसलत केली आहे. पुढील टप्प्यात निवृत्तीवेतन, सेवानिवृत्ती लाभ आणि सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या सुविधांशी संबंधित मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित होण्याची शक्यता आहे.