

Mutual Fund
Sakal
Active and Passive Mutual Fund : म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन आहे त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी सर्व गोष्टी जाणून घ्या असा सल्ला आपल्याला जाहिरातीत आजपर्यंत दिसत आला आहे. कारण आपल्या मेहनतीने कमावलेल्या पैशाचे गुंतवणूक करताना योग्य पर्याय निवडणे खूप महत्त्वाचे असते. यातही म्युच्युअल फंड हा पर्याय सध्या लोकप्रिय आहे.
यात सक्रिय (Active) म्युच्युअल फंड आणि निष्क्रीय (Passive) इंडेक्स फंड हे दोन पर्याय आहेत. हे दोन्ही दिसायला सारखे वाटत असले तरी त्यांच्यात मोठा फरक आहे. त्यामुळे आपल्या आर्थिक उद्दिष्टांनुसार योग्य पर्याय समजून घेणे आवश्यक आहे.