Growth Rate : विकासदर ६.७ टक्के राहण्याचा ‘इक्रा’चा अंदाज

भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ जूनअखेर संपलेल्या तिमाहीत ८.२ टक्के, सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत ८.१ टक्के आणि डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत ८.४ टक्के होती.
Growth Rate
Growth Rate Sakal

मुंबई : भारताचा विकासदर मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत ६.७ टक्के राहील, असा अंदाज ‘इक्रा’ या पतमानांकन संस्थेने वर्तविला आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी विकासदर ७.८ टक्के राहील, असा तिचा अंदाज आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ जूनअखेर संपलेल्या तिमाहीत ८.२ टक्के, सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत ८.१ टक्के आणि डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत ८.४ टक्के होती. ‘इक्रा’च्या मुख्य अर्थतज्ज्ञ आदिती नायर म्हणाल्या की, कमोडिटीतून मिळणारा नफा

आणि काही औद्योगिक क्षेत्रांतील नफा कमी झाल्याने चौथ्या तिमाहीत विकासदरावर परिणाम होण्याची शक्यता आहे. देशाचे एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) आर्थिक २०२२-२३ मधील चौथ्या तिमाहीत ६.१ टक्के होते. याचवेळी त्या आर्थिक वर्षात विकासदर सात टक्के होता.

चौथ्या तिमाहीची आकडेवारी ३१ मे रोजी जाहीर होणार आहे. त्यावेळी २०२३-२४ या पूर्ण आर्थिक वर्षाची आकडेवारीही जाहीर होईल. आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील तिसऱ्या तिमाहीत एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) आणि एकूण मूल्यवर्धन (जीव्हीए) यांच्यातील फरक एक टक्क्याच्या आसपास असेल. त्याआधीच्या तिमाहीत हा फरक १.८५ टक्के होता. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी सकल देशांतर्गत उत्पादन ७.८ टक्के आणि एकूण मूल्यवर्धन ७ टक्के राहील, असेही ‘इक्रा’ने म्हटले आहे.

गेल्या वर्षी मोसमी पाऊस कमी पडल्याने शेतीचे उत्पादन कमी झाले होते. आता ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी मिळू लागली असून, मागणी वाढण्याची चिन्हे आहेत, असे इक्राच्या मुख्य अर्थतज्ज्ञ आदिती नायर यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com