Ajit Pawar unveils plans for a stunning Skywalk at Malshej Ghat : राज्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारनं एक महत्त्वाची घोषणा केली आहे. माळशेज घाटात लवकरच स्कायवॉकची निर्मिती करणार असल्याचं अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितलं आहे. त्यामुळे पर्यटकांना आता माळशेज घाटात दरीवरून चालण्याचा थरारक अनुभव घेता येणार आहे.