Amazon Fine: डेटा प्रायव्हसी प्रकरणी अ‍ॅमेझॉनला 290 कोटी रुपयांचा दंड; काय आहे प्रकरण?

Amazon Fine: अ‍ॅमेझॉन कंपनी जगभरातील विविध देशांमध्ये सेवा पुरवते. पण सध्या ही कंपनी अडचणीत सापडली आहे. कारण कंपनीला मोठा दंड भरावा लागणार आहे. कंपनीच्या काही अंतर्गत यंत्रणांसाठी अॅमेझॉनला हा दंड भरावा लागणार आहे.
Amazon asked to pay fine of around Rs 290 crore for tracking employee activity and performance
Amazon asked to pay fine of around Rs 290 crore for tracking employee activity and performance Sakal

Amazon Fine: अ‍ॅमेझॉन कंपनी जगभरातील विविध देशांमध्ये सेवा पुरवते. पण सध्या ही कंपनी अडचणीत सापडली आहे. कारण कंपनीला मोठा दंड भरावा लागणार आहे. कंपनीच्या काही अंतर्गत यंत्रणांसाठी अॅमेझॉनला हा दंड भरावा लागणार आहे.

अॅमेझॉन अजूनही दावा करत आहे की त्यांच्या व्यवस्थापनात कोणतीही त्रुटी नाही. अॅमेझॉनही दंड भरण्याच्या आदेशाला आव्हान देत आहे. Amazon ला 32 मिलियन युरो म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 290 कोटी रुपये दंड भरावा लागणार आहे.

Amazon asked to pay fine of around Rs 290 crore for tracking employee activity and performance
Diamond Bourse: गड्या आपली मुंबईच भारी! सुरतमधील हिरे व्यापारी पुन्हा वळले मुंबईकडे; काय आहे कारण?

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, फ्रेंच डेटा प्रोटेक्शन एजन्सी सीएनआयएलने अॅमेझॉनला दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य तक्रार अॅमेझॉनच्या मॉनिटरिंग सिस्टमबद्दल आहे. अॅमेझॉन कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वापरत असलेल्या ट्रॅकिंग स्कॅनरबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

CNILने म्हटले आहे की अॅमेझॉनच्या कामगारांवर देखरेख ठेवण्याच्या पद्धतीमुळे कामगारांच्या खाजगी जीवनात हस्तक्षेप होतो. अधिकारांवरही प्रश्न निर्माण होतात. पण अॅमेझॉनचे मत आहे की ते जे करतात त्यात काहीही चुकीचे नाही.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांचे हित लक्षात घेऊन या मॉनिटरिंग सिस्टमचा वापर केला जातो. Amazon देखील CNILला आव्हान देण्याच्या तयारीत आहे.

Amazon asked to pay fine of around Rs 290 crore for tracking employee activity and performance
Gold Import Duty: सोन्या-चांदीवर सरकारने वाढवले आयात शुल्क, किंमतीवर काय परिणाम होणार?

याशिवाय अॅमेझॉन कंपनी संचालकांना ऑफिस टू ऑफिस (आरटीओ) धोरणाचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी रेटिंग देण्यास सांगत आहे. बिझनेस इनसाइडरच्या अहवालात असा दावा केला आहे की ई-कॉमर्स कंपनीने ऑफिसमध्ये न येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमोशन थांबवून ठेवले आहे.

काही Amazon कर्मचार्‍यांना शंका आहे की कंपनीचे रिटर्न-टू-ऑफिस धोरण हे कर्मचारी कपातीच्या धोरणाचा भाग आहे. Amazon कर्मचार्‍यांसाठी अवघड परिस्थिती निर्माण करत आहे. तसेच कंपनी कर्मचार्‍यांना स्वेच्छेने नोकरी सोडण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com